मुंबई- बजाज फायनान्सकडून ऑटोसाठी कर्ज घेणाऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. बजाज फायनान्स ऑटो कर्जाच्या ईएमआयला उशीर झाला तरी दंड आकारणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑटोसाठी कर्ज घेणाऱ्यांना बजाज फायनान्सकडून मार्च ते सप्टेंबरपर्यंत ईएमआयवर अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑटो संघटनेने ईएआयएमवरील दंड माफ करण्याची बजाज फायनान्स कंपनीकडे मागणी केली होती. त्यावर बजाज फायनान्सने ईएमआयचे धनादेश वटले नाही तर ५० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मार्च ते ऑगस्टमधील थकित कर्जावरील अतिरिक्त शुल्क ५० टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १.१९ लाख ग्राहकांना फायदा होणार आहे.