नवी दिल्ली- कोरोनाच्या काळात वाहन उद्योगातून दिलासादायक बातमी आहे. पुण्यात उत्पादन प्रकल्प असलेल्या बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बजाज ऑटोच्या ३,७२,५३२ वाहनांची डिसेंबर २०२० मध्ये विक्री झाली आहे. गतवर्षी बजाजच्या वाहनांची देशांतर्गत १,५३,१६३ वाहनांची विक्री झाली होती. यंदा देशांतर्गत बजाजच्या १,३९,६०६ वाहनांची विक्री झाली आहे.
हेही वाचा-मासिक हप्ता चुकला तरी बजाज फायनान्स ऑटो कर्जदारांना लावणार नाही दंड
- देशात डिसेंबरमध्ये एकूण ३,३८,५८४ दुचाकींची विक्री झाली आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये २,८४,८०२ दुचाकींची विक्री झाली होती.
- दुचाकींच्या विक्रीत एकूण १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. बजाज ऑटोच्या वाहन निर्यातीत २७ टक्के वाढ झाली आहे.
- चालू वर्षात २,३२,९२६ वाहनांची निर्यात झाली आहे. गतवर्षी बजाजच्या १,८२,८९२ वाहनांची निर्यात झाली होती.
हेही वाचा-वाहन उद्योगाची घसरलेली गाडी रुळावर; सप्टेंबरमध्ये बहुतांश कंपन्यांच्या वाहन विक्रीत वाढ
कोरोना महामारी आणि टाळेबंदीचा देशातील वाहन कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. असे असले तरी सप्टेंबरपासून मारुती सुझकी, एमजी मोटर्स, बजाज ऑटो आणि टोयोटो किर्लोस्कर या कंपन्यांच्या वाहन विक्रीत वाढ होत आहे.