महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

यवतमाळच्या सुताला चीनसह हाँगकाँगमधून मागणी; कोरोनासह मंदीतही बाबासाहेब नाईक सूतगिरणीची कामगिरी - कापूस सुत निर्यात न्यूज

बाबासाहेब नाईक सूतगिरणी ही महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तर विदर्भात ही सुतगिरणी पहिल्या क्रमांकावर आहे. या सुतगरिणीत उपलब्ध असलेल्या टीएफओ या अद्ययावत यंत्रवर तयार करण्यात आलेल्या 16 अकाउंटच्या दर्जेदार सुताला मंदीच्या काळातही मोठी मागणी आहे. एकूण दहा कंटेनरद्वारा 200 टन सुताची मागणी चीन व हॉगकॉग या देशातून नोंदविण्यात आली आहे.

सुत मशिन
सुत मशिन

By

Published : Dec 5, 2020, 3:28 PM IST

Updated : Dec 5, 2020, 3:54 PM IST

यवतमाळ- कोरोनाच्या काळात मंदीची लाट असतानासुद्धा सूत उत्पादनात महागाव तालुक्यातील पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीने गगन भरारी घेतली आहे. सूतगिरणीने दर्जेदार सुताची निर्मिती केल्यामुळे या सुताला विदेशातून मोठी मागणी आहे. त्यामुळे या गिरणीच्या दर्जदार सुताची निर्यात चीन व हॉंगकॉंग या देशात सातासमुद्रापार केली जात आहे.



बाबासाहेब नाईक सूतगिरणी ही महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तर विदर्भात ही सूतगिरणी पहिल्या क्रमांकावर आहे. या सूतगरिणीत उपलब्ध असलेल्या टीएफओ या अद्ययावत यंत्रवर तयार करण्यात आलेल्या 16 अकाउंटच्या दर्जेदार सुताला मंदीच्या काळातही मोठी मागणी आहे. एकूण दहा कंटेनरद्वारा 200 टन सुताची मागणी चीन व हॉगकॉग या देशातून नोंदविण्यात आली आहे. जास्त भाव मिळत असल्याने गिरणीच्या व्यवस्थापनाकडून सूत निर्यातीला प्राधान्य दिले जात आहे.

कोरोनासह मंदीतही बाबासाहेब नाईक सूतगिरणीची कामगिरी


कोरोना संसर्गजन्य काळातही गिरणीच्या व्यवस्थापनाकडून एक पाऊल पुढे टाकले आहे. संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री मनोहर नाईक, गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक एम.आय. पाथरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे टाळेबंदीनंतर तीन पाळ्यात पूर्ण क्षमतेने सूत उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सहभागातून 89 टक्के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे.

कापूस सूत गिरणी
टाळेबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना अर्धे वेतनकोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात गिरणी बंद असताना सूतगिरणी संचालक मंडळाने अधिकारी कर्मचारी आणि कामगार असे एकूण 375 जणांना 50 टक्के वेतन दिले आहे. यासाठी अध्यक्ष राजेश आसेगावकर व उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकटात कामगारांना मदत केली आहे. परिणामतः कामगारांच्या सहभागातून सूतगिरणीतील दर्जेदार सूत उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. कामगारांना एवढ्या मंदीच्या काळातसुद्धा नऊ टक्के दिवाळी वाढीव बोनस देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळी चांगली गेल्याने कामगार आनंद व्यक्त करीत आहेत.
सूतगिरणीचे पाहणी करताना पदाधिकारी
विदर्भात पहिल्या क्रमांकावर सूतगिरणीएकीकडे अनेक सूतगिरण्या बंद पडत असताना विदर्भातील बाबासाहेब नाईक सूतगिरणीने पूर्ण कार्यक्षमतेने विदर्भ पहिला क्रमांक मिळविला आहे. सूतगिरणीचे काम तीन पाळीत चालत आहे. नुकतेच चीनला 200 टन सूत निर्यात करण्यात आली आहे. तर पुन्हा 100 टन सूत लवकरच चीनला निर्यात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी येथेही सूत पाठविला जात असल्याची माहिती सूतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगावकर यांनी दिली.
सूत निर्मिती

नवीन मशिनमध्ये दर्जेदार सुताची निर्मिती-
बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक म्हणाले, की ही जुनी संस्था आहे. जुन्या मशिनमध्ये बदल करून नवीन मशिन बसविण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळात कामगारांना रोजगार टिकविण्यावर भर देण्यात आला आहे. संस्थेला पुढे नेण्यासाठी आधुनिकीकरण करण्यात आले आहे. जुन्या मशिनमध्ये धागा तुटला तर हाताने पुन्हा जोडावा लागत होता. नवीन मशीनमध्ये दर्जेदार सुताची निर्मिती होत आहे. त्यासाठी कामगारांचे सहकार्य मिळत आहे. सूतगिरणीचे संचालक विलास गंगाले म्हणाले, की जागतिक मंदी असूनही चीन व हाँगकाँगसारख्या देशात निर्यात होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. अडचणी असताना सक्षम नेतृत्वामुळे मात करत आहोत. नियोजनपद्धतीने काम सुरू आहे. राज्यात पूर्वी ३२७ सूतगरिण्या असताना सध्या जेमतेम पाच ते सात सूतगिरण्या आहेत. त्यात नाईक सूतगिरणी आघाडीवर असणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे गंगाले यांनी सांगितले.

Last Updated : Dec 5, 2020, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details