नवी दिल्ली- मारुती सुझुकी इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी मारुती कंपनीची वाहन उद्योगात विशेष ओळख निर्माण केली होती.
जगदशी खट्टर हे जुलै १९९३ मध्ये मारुती उद्योग लि. कंपनीत संचालक (मार्केटिंग) म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर सहा वर्षांनी ते मार्केटिंगमध्ये कार्यकारी संचालक झाले. १९९९ मध्ये खट्टर यांची मारुतीमध्ये संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी पदोनती झाली. त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून मे २००२ मध्ये धुरा स्वीकारली. वयाच्या ६५ व्या वर्षी २०९७ मध्ये ते निवृत्त झाले. मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव म्हणाले, की आयएएस ते मारुती रुजू होणारे जगदशी खट्टर हे पहिल्या दर्जाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने वैयक्तिक व वाहन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा-अॅमेझॉन भारताला देणार १० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स