नवी दिल्ली- एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) उपाध्यक्षपदी भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा यांची निवड झाली आहे. लवासा यांच्याकडे खाजगी क्षेत्रातील कामे आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी यांची जबाबदारी एडीबीने दिली आहे.
अशोक लवासा हे निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रीय वित्त आयोगाचे सचिव, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे सचिव, पर्यावरण आणि हवामान बदलाचे सचिव आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सचिव म्हणून काम केले आहे.