चेन्नई - वाहन उद्योगातील मंदीचा वाहन कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. बाजारामधून मागणी कमी झाल्याने हिंदूजा ग्रुपची मालकी असलेली अशोक लिलँडने काही दिवस उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील बांद्रा येथील उत्पादन प्रकल्प १० दिवस बंद राहणार आहे.
अशोक लिलँडने सप्टेंबरमध्ये काही दिवस उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्यात येणार असल्याचे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. चेन्नईची मूळ कंपनी असलेल्या अशोक लिलँडने इन्नोरमधील उत्पादन प्रकल्प १६ दिवस बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. तर तामिळनाडूमधील होसूरमधी प्रकल्प ५ दिवसासाठी बंद राहणार आहे. राजस्थानमधील अलवार व महाराष्ट्रातील बांद्रा येथील उत्पादन प्रकल्प १० दिवस बंद राहणार आहे. तर उत्तराखंडमधील पटनानगरमधील उत्पादन प्रकल्प १८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
हेही वाचा-धक्कादायक! 32,000 कोटींच्या विविध प्रकरणात 18 सरकारी बँकांची फसवणूक