महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोना इफेक्ट : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, एप्रिलमध्ये लाखो लोकांचा रोजगार हिरावला - अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम

अमेरिकेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद झाल्याने अर्थव्यवस्था ढासळली झाली आहे. मार्च महिन्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण ४.४ टक्क्यावर होते मात्र, एप्रिलमध्ये हा आकडा १६ टक्क्यांवर येऊन पोहचला आहे. एप्रिल महिन्यामध्ये १२ दशलक्षहुन अधिक लोकांवर बेरोजगारीची ढाल कोसळल्याचे अर्थतज्ज्ञांनी फॅक्टसेटच्या प्राप्त अहवालातून सांगितले आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली

April jobs data to show epic losses and soaring unemployment in USA
April jobs data to show epic losses and soaring unemployment in USA

By

Published : May 7, 2020, 11:10 AM IST

Updated : May 7, 2020, 3:08 PM IST

वॉशिंगटन - कोरोनाा संसर्गाच्या उद्रेकामुळे जगभरावर संकट ओढावले आहे. या महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातील खासगी क्षेत्रातील व्यवसाय आणि व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. बंदमुळे नोकरवर्गावरही गदा आली असून अमेरिकेसारख्या देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये अनेकांचे रोजगार जाऊन नैराश्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे.

अमेरिकेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद झाल्याने अर्थव्यवस्था पंगू झाली आहे. मार्च महिन्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण ४.४ टक्क्यावर होते मात्र, एप्रिलमध्ये हा आकडा १६ टक्क्यांवर येऊन पोहचला आहे. एप्रिल महिन्यामध्ये १२ दशलक्षहुन अधिक लोकांवर बेरोजगारीची ढाल कोसळल्याचे अर्थतज्ज्ञांनी फॅक्टसेटच्या प्राप्त अहवालातून सांगितले आहे. महामंदीच्या काळानंतर ११ वर्षात नोकरीक्षेत्रात झालेली वाढही महामारीच्या पार्श्वभूमीवर एका महिन्यात संपुष्टात आल्याचा अंदाज आहे. मात्र, कोरोनामुळे नोकर क्षेत्रात झालेल्या नुकसानीचा परिपूर्ण आकडा अद्याप समोर यायचा आहे.

माहितीनुसार, यातील काही जणांना कामातून काढले नसले तरी त्यांच्या कामाच्या वेळेत तर, काहींच्या पगारात कपात करण्यात आली आहे. कोरोनामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात करण्यात शटडाऊन करण्यात आले. परिणामी नोकरी गमावलेल्यांपैकी काहीजणांना परत नोकरी शोधणे कठीण होऊन बसले आहे. त्यांना या बंदमध्ये बाहेर पडून नोकरी शोधता येणार नाही तसेच त्यांची बेरोजगार म्हणूनही गणना करता येणार नाही. तर, नोकरीतील व्यापकता वाढवण्याकरता मोठ्या प्रमाणावर प्रौढ नागरिकांच्या नोकरीही जाण्याची शक्यता आहे. हे सर्वच खूप अनअपेक्षित आणि आश्चर्यकारक असल्याचे ग्रांट थॉर्नटनचे मुख्य अर्थतज्ज्ञ डाएन स्वॉन्क यांनी सांगितले. हा धक्का आणि त्याचे कारण दोन्हीही गोष्टी आपण आयुष्यात कधीही पाहिलेल्या अनेक अनुभवांपेक्षा वेगळ्या आणि अनअपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

शासनाकडून शुक्रवारी सकाळी एप्रिल महिन्यातील नोकरवर्गाचा अहवाल जारी करण्यात येणार आहे. गुरुवारी बेरोजगारी संदर्भातील नवीन साप्ताहिक अहवाल जाहीर करण्यात येईल. ७ आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या शटडाऊनपासून तर आत्तापर्यंत बेरोजगारी ओढावलेल्यांची संख्या जवळपास ३४ दशलक्षच्या घरात पोहोचलेली आहे. तर, गेल्या आठवड्यात सुमारे 3.5 दशलक्ष लोकांनी बेरोजगारीमुळे आलेल्या संकटकाळी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

नोकरी क्षेत्रातील नुकसानीचा हा आकडा काढण्यासाठी हा दोन प्रकारे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सरकार व्यवसाय, व्यावसायिक, नोकरवर्गांच्या घरांचे सर्वेक्षण करुन नोकरी गमावल्यामुळे झालेल्या नुकसानाची गणना करण्यात आली. यात एप्रिलमध्ये अपेक्षित असलेल्या नुकसानीच्या तुलनेत हा आकडा खूपच जास्त आहे. यामध्ये, अमेझॉन आणि त्यासारख्या अनेक ऑनलाईन दुकानांमध्ये काही लोकांना रोजगार मिळाल्याचे आकडेदेखील आहेत. तर, दुसरीकडे मार्चमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अ‌ॅप्लीकेशनमध्ये बेरोजगारांनी नोंदणी केल्याचे आकडेदेखील आहेत. मात्र, एप्रिलमध्ये नोकरी जाणाऱ्यांची संख्या अपेक्षेच्या तुलनेत खूप जास्त असल्याचे दिसून येते. यात, बहुतेक अर्थतज्ज्ञांनी नेहमीप्रमाणे तयार केलेले मॉडेल्सदेखील या ढासळणाऱ्या नोकरी क्षेत्राला वाचवण्यास उपयोगी ठरत नसल्याचे त्यांनी कबूल केले.

बेरोजगार झालेल्यांपैकी काही अनाधिकृत प्रवाशांनी यातून फायदा उचलण्यासाठी या अ‌ॅप्लीकेशनमध्ये शेवटच्या महिन्यात नोंदणी केली असल्याचा अंदाज स्वान्क यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्याही नुकसानींची मोजणी सरकारच्या सर्वेक्षणात करण्यात आली असावी, आणि त्यामुळेच हा आकडा ३४ दशलक्षापर्यंत नोंदवला गेल्याचा अंदाज स्वान्क यांनी बांधला आहे. एप्रिल-जून या त्रैमासिक काळात ४० टक्क्यांच्या वार्षिक घसरणीमुळे खासगी कंपन्या अजूनही मोठ्या नुकसानीचा सामना करत असून त्यांच्याकडून नोकरवर्गातील कपात सुरुच आहे. यामध्ये जीई एव्हीएशनसारख्या कंपन्या असून जीई एव्हीएशन जवळपास १३ हजार तर, उबर ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. यामध्ये मजुर आणि कामगार वर्गातील लोकांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यांनी मदतीच्या अपेक्षेनुसार नोकरीसंबंधी नोंदणी केली असल्यास त्यांचेदेखील बेरोजगारीच्या यादीत नाव सामील झाले असेल. तर, अनेकजण आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि मुलांसाठी घरातच राहत असल्याने सर्वेक्षणात त्यांचेही नाव आले असण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक व्यवसाय बंद झाल्यामुळे बेरोजगारीचा सामना करत असलेल्यांपैकी अनेकांना नवीन रोजगार शोधताना निराशाच हाती लागू शकते.

याव्यतिरिक्त, शासनाद्वारे तात्पुरत्या स्वरुपात किंवा कंत्रांटी कामावर ठेवण्यात आलेल्या आणि सुट्टीवर असलेल्या लोकांचेही यात नाव असू शकते. त्यांचे काम सुरू झाल्यावर ते परत त्यांच्या कामावर परत येऊ शकतात. मार्चमध्ये कोरोनासारख्या महामारीमुळे अशा प्रकारे करण्यात आलेल्या शटडाऊनमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात केलेल्या चुकीच्या वर्गीकरणामुळेही हा आकडा वाढल्याची शक्यता आहे. कारण, यापूर्वी साथीच्या आजाराशी संबंधित शटडाउनवर अशा प्रकारची कारवाई कधीच करण्यात आली नव्हती, ज्यामुळे, बेरोजगारीचे प्रमाण इतक्या मोठ्या संख्येने घसरेल, असे स्पष्टीकरण कामगार विभागाकडून देण्यात आले आहे.

Last Updated : May 7, 2020, 3:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details