सॅनफ्रान्सिस्को– अॅपलचे सीईओ टिम कुक हे पहिल्यांदाच अब्जाधीश झाले आहेत. आयफोन उत्पादन करणाऱ्या अॅपल कंपनीने आजवरच्या सर्व तिमाहीमधील व्यवसायाचे विक्रम मोडले आहेत. या विक्रमानंतर कंपनी ही जगात सर्वाधिक मूल्य असलेली 1.84 लाख कोटी डॉलर असलेली कंपनी झाली आहे.
टिम कुक यांचे उत्पन्न हे 1 अब्ज डॉलरहून अधिक झाले आहे. त्यामुळे ते अब्जाधीश झाले आहेत. मात्र, कुक यांना अजूनही इतर तंत्रज्ञान कंपन्यांच्या सीईओप्रमाणे संपत्ती मिळविण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस (187 अब्ज डॉलर), मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स (121 अब्ज डॉलर) आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (102 अब्ज डॉलर) यांची अशी संपत्ती आहे.