महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अपोलो हॉस्पिटल १ मेपासून १८-४४ वयोगटाकरिता निवडक केंद्रावर करणार लसीकरण - Apollo Hospitals on vaccination

कोरोना लशींची खरेदी करून लसीकरण करण्याची परवानगी मिळालेले अपोलो हॉस्पिटल हे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. सरकारच्या निर्देशाप्रमाणे थेट उत्पादकांकडून लस खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

vaccination
लसीकरण

By

Published : Apr 30, 2021, 9:13 PM IST

नवी दिल्ली -लसीकरणाची प्रतिक्षा असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अपोलो हॉस्पिटल ग्रुपकडून १ मे रोजी देशातील निवडक रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी लसीकरण महत्त्वाचे हे लक्षात घेऊन अपोलो रुग्णालयाने उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत सरकारच्या निर्देशाप्रमाणे थेट उत्पादकांकडून लस खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना लशींची खरेदी करून लसीकरण करण्याची परवानगी मिळालेले अपोलो हॉस्पिटल हे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे.

हेही वाचा-महाराष्ट्र दिनानिमित्त लसीकरणाचा मुहूर्त.. १८ ते ४४ वयोगटापर्यंतच्या व्यक्तींना मिळणार लस

राज्यांमध्ये लशींचा तुटवडा-

केंद्र सरकारने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात १ मे रोजीपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना लशींचा पुरवठा मिळाला नाही. त्यामुळे अनेक राज्यांनी लसीकरण करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. लस अतिशय कमी स्वरुपात उपलब्ध असल्याने सुरुवातीला राज्यातील निवडक केंद्रावर लस दिली जाणार असल्याचे महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-जनजीवन सुरळीत होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी - डॉ. तात्याराव लहाने

एकीकडे सरकारकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिने लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र, मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात लसीचा पुरवठा होत आहे. यामुळे देशातील अनेक जिल्ह्यातील प्रशासनाला नेमकी लसीकरण मोहीम कशी हाताळावी? हा प्रश्न समोर येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने वयोगट 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण जिल्हा प्रशासनाला अडचणी येत आहेत. तसेच लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असताना कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details