महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 19, 2020, 4:34 PM IST

ETV Bharat / business

धक्कादायक! देशातील 30 ते 40 टक्के रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर...

दिल्लीमधील खान मार्केटमधील प्रसिद्ध उपाहारगृहांनी यापूर्वीच व्यवसाय बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर तशीच अनेक उपाहारगृहे घोषणा करतील, अशी भीती उद्योगातील सूत्राने व्यक्त केली आहे.

रेस्टॉरंट उद्योग
रेस्टॉरंट उद्योग

नवी दिल्ली – देशातील सुमारे 30 ते 40 टक्के उपाहारगृहे (संघटित क्षेत्रातील) लवकरच बंद पडण्याची भीती उपाहारगृहे (रेस्टॉरंट) उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामधील 50 लाख उपाहारगृहे ही मोठया शहरातील असतील, असे उद्योगातील सूत्राने सांगितले.

दिल्लीमधील खान मार्केटमधील प्रसिद्ध उपाहारगृहांनी यापूर्वीच व्यवसाय बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर तशीच अनेक उपाहारगृहे घोषणा करतील, अशी भीती उद्योगातील सूत्राने व्यक्त केली आहे.

ओलिव्ह ग्रुप रेस्टॉरंटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक ए. डी. सिंह म्हणाले, की उद्योगापुढे भविष्यासाठी पर्याय नाही. संचारबंदी ते दारूबंदीसारख्या नियमामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायामधून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. टाळेबंदीने झालेले नुकसान भरून काढणे अवघड झाले. त्यामुळे अनेकजण व्यवसाय बंद करत आहेत.

प्रत्यक्ष स्थिती

उपाहारगृह उद्योगाला सर्वात मोठा फटका बसला आहे, हे समजण्यासाठी विज्ञानाची गरज नसल्याचे उद्योगातील तज्ज्ञ सांगत आहेत. उपाहारगृह उद्योग हा सामाजिक एकत्रिततेमधून आणि लोकांनी कुटुंब-मित्रांसोबत चांगला वेळ दिल्याने टिकू शकतो. मात्र,कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शारीरिक अंतर ठेवण्यासारखे नियम पाळावे लागत आहेत. त्याशिवाय या उद्योगाला चालविण्यासाठी रोज दैनंदिन पैशांची गरज असते. त्याचाही उद्योगाला फटका बसला आहे.

उपाहारगृहांसाठी लागणारे अधिक भाडे हीदेखील मोठी समस्या आहे. कोरोनाच्या संकटामुळे सरकारने लागू केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे उपाहारगृहांना पालन करणे कठीण जात आहे. जरी ह नियम नसले तरी ग्राहक सध्याच्या काळात उपाहारगृहात बसून जेवणे कठीण आहे. अनेक अनोळखी लोक तिथे येत असताना ग्राहक किमान तिथे 40 मिनिटे थांबण्यासाठी धजावणार नाहीत. तसेच आर्थिक मुद्दाही आहे.

उपाहारगृहात जावून खाणे ही मोठी आणि आवश्यक गरज नाही. जेव्हा तुम्हाला समाजात मिसळायला आवडते, तेव्हा तुम्ही खाण्यासाठी बाहेर जाता, असे थर्ड आयसाईटचे संस्थापक देवांग्षु दत्ता यांनी सांगितले. जर तुम्हाला भविष्यातील उत्पन्नाची शाश्वती नसेल तर तुम्ही पैसे खर्च करण्याबाबत हात आखडता घेण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत बाहेरील खाण्यावर पहिल्यांदा बंधने येतात, असे दत्ता यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय उपाहारगृहे संघटनेचे (NRAI) अध्यक्ष अनुराग कटरियार म्हणाले, की उपाहारगृह उद्योगात व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी अधिक पैसे लागतात. या उद्योगात खेळते भांडवल नाही. तर दुसरीकडे अनिश्चितता वाढत आहे. भांडवल नसताना तोटा होत असल्याने उपाहारगृह बंद होण्याची संख्या वाढत आहे. ते चालविण्यासाठी द्यावे लागणारे भाडेही खूप असते. त्यामुळे 30 ते 40 टक्के उपाहारगृहे बंद पडण्याची भीती आहे.

मॅसिव्ह रेस्टॉरंटचे संस्थापक झोरावार कालरा म्हणाले, की किमान 25 ते 40 टक्के रेस्टॉरंट ही कधीच पुन्हा उघडणार नाहीत.

काय आहे उपाय-

आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या उपाययोजना करण्याचा एकाचेळी उद्योगाला फायदा व तोटा आहे. अशा उपाययोजना केल्याने खर्चात मोठी वाढ होणार आहे. तर दुसरीकडे ग्राहकांमधील विश्वास वाढीस लागू शकतो. त्यामुळे डिजीटल मेन्यू, डिजीटल पेमेंट असे पर्याय उपयुक्त ठरू शकतात.

ऑनलाईन बुकिंग, ऑर्डर, प्रतिक्षा व्यवस्थापन करून गर्दी कमी करणे असे पर्याय आहेत. काही लोकप्रिय उपाहारगृहांनी तसे व्यवसाय सुरू केले आहेत. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे.

इम्प्रेसिओ हँडमेट रेस्टॉरंटचे व्यवस्थापकीय संचालक रियाज अमलानी म्हणाले, की उपाहारगृहांना डिजीटल माध्यम, संपर्कविरहित अन्न देणे आणि जंतूनाशकांचा वापर याशिवाय पर्याय नाही. तर तिथे केवळ 50 टक्केच ग्राहकांना परवानगी द्यावी लागणार आहे. दारुला परवानगी नाही व वेळेचे बंधन अशा स्थितीत उपाहारगृहांना पैसे मिळविणे शक्य होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

( हा लेख शर्मिला दास यांनी लिहिला आहे. त्या दिल्लीस्थित मुक्त पत्रकार आहेत.)

ABOUT THE AUTHOR

...view details