महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Airtel Digital TV आणि Dish TV एकत्र सेवा देणार? - dth

मीडिया रिपोर्ट्सनुसार Bharti Airtel ही कंपनी Dish TV सह मर्जरची प्लानिंग करत आहे. अशात चर्चा आहे, की या कंपन्या पूर्वीपासूनच जिओच्या प्लानला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. माध्यमांनुसार सध्या मर्जरसंबंधी बोलणी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. जर असे घडते तर DTH च्या क्षेत्रात जिओला मोठे आव्हान मिळणार.

Airtel Digital TV आणि Dish TV एकत्र सेवा देणार?

By

Published : Mar 20, 2019, 2:57 PM IST

Updated : Mar 21, 2019, 9:31 AM IST

टेक डेस्क - मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ केवळ टेलिकॉम क्षेत्रापर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच DTH सेवा प्रदान करण्याची योजना आखत आहे. जिओने केबल कंपन्या उदाहरणार्थ Hathway, Datacom आणि DEN चा मोठा हिस्सा खरेदी केला आहे.


रिलायन्सने या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी अन्य कंपन्यांनी आपली तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Bharti Airtel ही कंपनी Dish TV सह मर्जरची प्लानिंग करत आहे. अशात चर्चा आहे, की या कंपन्या पूर्वीपासूनच जिओच्या प्लानला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. माध्यमांनुसार सध्या मर्जरसंबंधी बोलणी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. जर असे घडते तर DTH च्या क्षेत्रात जिओला मोठे आव्हान मिळणार.

सध्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार Airtel Digital TV आणि Dish TV मर्ज झाल्यानंतर खूप मोठे युनिट बनणार. दोघांचे एकत्रीकरण झाले तर ही कंपनी जगातील सर्वात मोठी टीव्ही डिस्ट्रीब्युशन कंपनी बनणार. दोघांचे मिळून ३८ मिलियन सब्सक्रायबर्स होतील आणि DTH बाजारातील ६१ टक्के हिस्सा या कंपनीचा असणार.

Last Updated : Mar 21, 2019, 9:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details