महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

विमान भाड्यात १०० टक्क्यांपर्यंत वाढ; प्रवाशांना आर्थिक फटका - Air ticket

शेवटच्या मिनिटात बुकिंग करण्यात येणाऱ्या विमान तिकिटीचे दर १०० टक्क्याहून वाढले आहेत. विविध कारणामुळे अनेक विमानांनी उड्डाणे घेतली नाहीत

प्रतिकात्मक

By

Published : Mar 14, 2019, 4:42 PM IST

नवी दिल्ली / मुंबई - विमान भाड्यात १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने 737 मॅक्स एअरक्राफ्ट विमानाच्या उड्डाणावर मनाई केल्याचा हा परिणाम झाला आहे. विशेषत: दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकातासह मुंबई-बंगळुरू मार्गावरील विमान तिकीटाचे दर वाढले आहेत.

शेवटच्या मिनिटात बुकिंग करण्यात येणाऱ्या विमान तिकिटीचे दर १०० टक्क्याहून वाढले आहेत.विविध कारणामुळे अनेक विमानांनी उड्डाण घेतली नाहीत. आसनक्षमता कमी झाल्याने एका रात्रीतच तिकीटाच्या दरात वाढ झाल्याचे इक्सिकोचे सीईओ आणि सहसंस्थापक आलोक वाजपाई यांनी सांगितले. मुंबई-चेन्नई मार्गावरील विमानाचे तिकिट ५ हजार ३३९ रुपये असताना ते २६ हजार ७३ रुपयावर पोहोचले आहे. होळी आणि मुलांना शाळेला मिळालेल्या सुट्ट्या यामुळेही तिकीट दर वाढल्याचे त्यांनी सांगितले.


ABOUT THE AUTHOR

...view details