नवी दिल्ली- विमान वाहतूक सेवा थोडी महागणार आहे. कारण, केंद्र सरकारने विमान तिकिटाचा दर ५ टक्क्यांनी वाढविण्याची मर्यादा विमान कंपन्यांना दिली आहे. विमान इंधनाचे दर वाढले असताना सरकारने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.
विमान तिकिटाचे दर कमीत कमी ठेवण्यासाठी ५ टक्क्यांची मर्यादा वाढविली आहे. असे असले तरी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान तिकिटाचे दर जास्तीत जास्त ठेवण्याची मर्यादा कायम ठेवली आहे. महिनाभरापूर्वी केंद्र सरकारने विमान तिकीटावरील कमीत कमी आणि जास्त जास्त मर्यादा १० ते ३० टक्क्यांनी वाढविली होती.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ट्विट हेही वाचा-टीसीएसकडून कोरोना महामारीतही कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनवाढ
गतवर्षी मे महिन्यामध्ये देशांतर्गत विमान वाहतूक सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यावेळी विमान तिकिटाचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारने तिकिटाच्या दरावर मर्यादा आखून दिली होती. यामध्ये तिकिटांचा दर विमान प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेप्रमाणे कंपन्यांना लागू करावा लागतो. सामान्यत: कंपन्यांकडून मागणीप्रमाणे तिकिटांचे दर निश्चित करण्यात येतात.
हेही वाचा-बीएमडब्ल्यूचेही येणार इलेक्ट्रिक मॉडेल; चालू वर्षात आय फोर होणार लाँच
देशातील विमान कंपन्या कोरोनामुळे आर्थिक संकटात -
कोरोना महामारीत निर्बंधामुळे देशातील विमान कंपन्या आर्थिक संकटात आहेत. त्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतन कपात, भत्त्यांत कपात, कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे असे निर्णय घेतले होते. देशांतर्गत विमान सेवा टाळेबंदीनंतर 25 मे रोजी सुरू केली आहे. मात्र, अद्याप आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवर निर्बंध कायम आहेत.