हैदराबाद- देशात विमान प्रवास आणखी महागणार आहे. केंद्र सरकारने विमान सुरक्षा फी (एएसएफ) वाढीला परवानगी दिली आहे. त्यामुळे १ जुलैपासून विमानांच्या तिकिटांचे दर वाढणार आहेत.
केंद्राचा सुरक्षा फी वाढीला हिरवा कंदील, विमान प्रवास १ जूलैपासून महागणार - विमान तिकीट बुकिंग
देशात विमान प्रवास कररणाऱ्या प्रति प्रवाशाला दीडशे रुपये द्यावे लागणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशाला ४.८५ डॉलर रुपये द्यावे लागणार आहेत.
केंद्र सरकारने एएसएफला मान्यता दिल्यानंतर केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने आदेश काढले आहेत. या आदेशाप्रमाणे देशात विमान प्रवास कररणाऱ्या प्रति प्रवाशाला दीडशे रुपये द्यावे लागणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशाला ४.८५ डॉलर रुपये द्यावे लागणार आहेत. हे दर १ जूलै २०१९ पासून लागू होणार आहेत.
यापूर्वी देशात विमान प्रवास करणाऱ्यांना १३० रुपये प्रवासी सेवा फी द्यावी लागत होती. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ३.२५ डॉलर रुपये द्यावे लागत होते. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार प्रवाशांना सेवा फीऐवजी विमान सुरक्षा फी द्यावी लागणार आहे.