महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाच्या संकटात इंग्लंडला भारताने 'अशी' केली मदत - एअर इंडिया कॉर्गो

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार १३ एप्रिलला विमानांनी उड्डाणे केली होती. त्याचदिवशी परतत असताना विमानांनी १५.६ टनाची साधनसामुग्री आणली आहे.

एअर इंडिया
एअर इंडिया

By

Published : Apr 15, 2020, 11:44 AM IST

नवी दिल्ली- एअर इंडियाने २८.९५ टनांचे फळे आणि पालेभाज्या मालवाहू विमानाने लंडनला पोहोचविली आहेत. इतर देशांच्या शहरातही फळे व पालेभाज्या पाठविण्यात येणार असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार १३ एप्रिलला विमानांनी उड्डाणे केली होती. त्याचदिवशी परतत असताना विमानांनी १५.६ टनाची साधनसामुग्री आणली आहे. महत्त्वाची वैद्यकीय साधनांचा पुरवठा करण्यासाठी गरजेप्रमाणे एअर इंडिया मालवाहू विमाने विदेशात पाठविणार आहे.

हेही वाचा-देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका; २०२० मध्ये १.९ टक्के विकासदर - आयएमएफचा अंदाज

एअर इंडियाने दक्षिण आशियामध्ये ७ एप्रिलला ९ टनांची वाहतूक केली आहे. तर ८ एप्रिल २०२० ला कोलंबोमध्ये ४ टनाची वाहतूक केली आहे. एअर इंडियाने ४ एप्रिलपासून चीन आणि भारतात एअर ब्रिज प्रस्थापित केला आहे. याद्वारे औषधी, कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी साधने आणि वैद्यकीय उपकरणांची विमान वाहतूक करण्यात येत आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये दिलासा; 'या' चार शहरामध्ये सुरू होणार उबेरची प्रवास सेवा

ABOUT THE AUTHOR

...view details