महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

उत्तरसह मध्य भारतात उष्णतेची लाट, एअर कुलरची विक्री होणार दुप्पट

गतवर्षीच्या तुलनेत कुलरची मागणी दुप्पट होईल, असा विश्वास व्होल्टाजचे एमडी आणि सीईओ प्रदीप बक्क्षी यांनी व्यक्त केला. कुलरची बाजारपेठ ही पश्चिम आणि दक्षिण भारतात वेगाने विस्तारत आहे. तर त्याहून अधिक उत्तर आणि दक्षिण भारताच्या बाजारपेठेत विस्तार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सौजन्य- बजाज ट्विटर

By

Published : Jun 3, 2019, 1:32 PM IST

नवी दिल्ली - यंदा देशात उन्हाचा पारा वाढत असताना उत्तर आणि मध्यभारतात उष्णतेची लाट आली आहे. याचा परिणाम म्हणून एअर कुलरची विक्री दुप्पट होणार असल्याचा अंदाज आहे. ब्रँडेड कुलरची बाजारपेठेत मागणी वाढेल, अशी विविध कंपन्यांना अपेक्षा आहे.

गतवर्षीच्या तुलनेत कुलरची मागणी दुप्पट होईल, असा विश्वास व्होल्टाजचे एमडी आणि सीईओ प्रदीप बक्क्षी यांनी व्यक्त केला. कुलरची बाजारपेठ ही पश्चिम आणि दक्षिण भारतात वेगाने विस्तारत आहे. तर त्याहून अधिक उत्तर आणि दक्षिण भारताच्या बाजारपेठेत विस्तार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बजाज ईलेक्ट्रीकल्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल शर्मा यांनी एकूण कुलरची विक्री एप्रिल ते जूनदरम्यान १० ते १५ टक्क्याने वाढेल, असे म्हटले आहे. तर बजाजच्या उत्पादनाची विक्री इतर सर्व उत्पादनांच्या तीन ते चारपटीने वाढेल, असे सांगितले.

सिंफनी कंपनीचे चेअरमन अचल बाकेरी यांनी गतवर्षीहून यंदा एप्रिलमध्ये कुलरची अधिक विक्री झाल्याचे सांगितले.

यामुळे ग्राहक वळत आहेत ब्रँडेड कुलरकडे-

प्रत्यक्षात कुलरच्या बाजारपेठेत ब्रँडेड नसलेल्या स्थानिक उद्योगांनी तयार केलेले कुलर अधिक दिसून येतात. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून नॉन ब्रँडेड आणि ब्रँडेड कुलरच्या किमतीमधील फरक कमी झाला आहे. त्यामुळे ग्राहक ब्रँडेड कुलरकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलरमध्ये असे वापरले जाते अत्याधुनिक तंत्रज्ञान -
कुलर कंपन्या टच डिजीटल कंट्रोल पॅनेल, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बहुस्तरीय वायुशुद्धीकरण, उच्चक्षमतेचे कुलिंग पॅड्स, जीवाणूप्रतिरोधक टँक अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
तसेच कंपन्यांचे ब्रँडिंग करण्यासाठी अधिक खर्च करत आहे.

बजाज ईलेक्ट्रीकल्स कंपनीचने पहिला आयओटी तंत्रज्ञान असलेला पहिला कुलर बाजारात आणला आहे. या तंत्रज्ञानाने स्मार्टफोन अॅपच्या सहाय्याने जगभरातून कुठूनही कुलरची सर्व बटने नियंत्रित करता येतात. तर कुलरमधील स्मार्ट सेन्सर बसविलेले असते. त्यामुळे हवेतील तापमान व आद्रतेप्रमाणे कुलरची यंत्रणा कार्यरत राहून रुममधील तापमान नियंत्रित ठेवण्यात येते.
तर व्होल्टाजने अँटी बँक्टेरियल टँक असलेले आद्रता असलेला कुलर बाजारात आणला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details