महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

न्यूझीलंडमधील हल्ल्याच्या व्हिडिओला 'एआय' ओळखू शकले नाही,  फेसबुकची कबुली - Live broadcasts

न्यूझीलंडमधील दहशतवादी घटनेची 'हाऊस होमलँड सेक्युरिटी कमिटी'चे चेअरमन बेन्नी थॉम्पसन यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, युट्युब या कंपन्यांच्या संचालकांना व्हिडिओच्या वापराबाबत २६ मार्चला खुलासा करण्यास सांगितले.

न्यूझीलंडमधील दहशतवादी

By

Published : Mar 21, 2019, 8:28 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - न्यूझीलंडमध्ये मशिदीवर केलेला हल्ला दहशतवाद्याने फेसबुकवरून लाईव्ह केला होता. यानंतर जगभरातून फेसबुकवर टीकेची झोड उठली आहे. यावर फेसबुकचे उपाध्यक्ष गॉय रोझेन यांनी कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता असलेल्या साधनाला हा भयंकर व्हिडिओ शोधता आला नाही, याची कबुली दिली आहे.

तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करणार असल्याचे गॉय रोझेन यांनी सांगितले. मात्र, प्रसारण वाहिन्या लाईव्ह व्हिडिओची सेवा वापरत असल्याने फेसबुक लाईव्हला वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. फेसबुकवर दररोज दहा लाखांहून अधिक लाईव्ह प्रसारण होत असल्याची त्यांनी माहिती दिली. अशा घटनेबाबत कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या साधनाकडून त्वरित प्रतिक्रिया देण्यात यावी, यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. न्यूझीलंडमधील दहशतवादी घटनेची 'हाऊस होमलँड सेक्युरिटी कमिटी'चे चेअरमन बेन्नी थॉम्पसन यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, युट्युब या कंपन्यांच्या संचालकांना व्हिडिओच्या वापराबाबत २६ मार्चला खुलासा करण्यास सांगितले.

काय घडली होती घटना-

बंदुकधारी दहशतवाद्याने गोळीबाराचे १७ मिनिटे फेसबुकवरून लाईव्ह केले होते. ही घटना १५ मार्चला ख्रिस्टचर्च येथील मशिदीजवळ घडली होती. या भयंकर घटना युट्युब आणि ट्विटरवर दहा लाखाहून अधिक शेअर करण्यात आले होते. दहशतवादी हल्ल्यात ५० जणांचा मृत्यू झाला होता. तर १२ हून अधिक जण जखमी जाले होते. दहशतवादी ऑस्ट्रेलियन नागरिक असून त्याचे नाव ब्रेंटॉन टॅरंट असल्याचे समोर आले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details