नवी दिल्ली- ऐन कोरोना महामारीत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या राजस्थानमधील श्री गंगानगरमधील शहरामध्ये डिझेलचे दर पेट्रोलनंतर प्रति लिटर १०० रुपयांचा टप्पा ओलांडणार आहे. दोन्ही इंधनाचे दर प्रति लिटर १०० हून अधिक असलेले श्री गंगानगर हे देशातील पहिले शहर असणार आहे.
श्री गंगानगर शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.६५ रुपये आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलचा दर १०० रुपयांनी ओलांडला आहे. बुधवारी डिझेलचे दर प्रति लिटर २७ पैशांनी वाढले आहेत. या दरवाढीनंतर डिझेलचा दर प्रति लिटर ९१.५१ रुपये आहे. राजस्थानमधील पाकिस्तान सीमेनजीक असलेल्या शहरांमध्ये डिझेलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या पाच ते सहा आठवड्यांपासून पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. या दरवाढीनंतर देशातील शहरांमध्ये डिझेलचे दर १०० रुपयांहून अधिक पोहोचले आहेत.