नवी दिल्ली- समाज माध्यमात वापरकर्त्यांचा डाटा लिक होण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत. फेसबुकच्या वापरकर्त्यांना डाटा लिक होणे अजून पचनी पडलेले नसताना लिंक्डइनकूडन डाटा लिक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तोही थोडाथोडका नाही, तर सुमारे 50 कोटी जणांचा डाटा लिंक्डइनवरून लिक झाला आहे.
लिंक्डइनवरील 50 कोटी प्रोफाईलचा डाटा हा प्रसिद्ध अशा हॅकर फोरममध्ये बेकायदेशीरपणे विक्रीला ठेवण्यात आला. वापरकर्त्यांचा डाटा असलेल्या चार फाईल्समध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. यामध्ये वापरकर्त्यांचे संपूर्ण नाव, ईमेल पत्ते, फोन क्रमांक, जागेच्या ठिकाणाची माहिती आदीचा समावेश आहे. एवढेच नाही तर, त्यामध्ये लिंक्डइन आयडी, लिंग, सोशल मीडिया फ्रोफाईल अशी माहितीदेखील आहे.