महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

चीनमधून २०० अमेरिकन कंपन्या उत्पादन प्रकल्प भारतात हलविणार - US Trade

सरकारने निर्णय प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणण्याचा त्यांनी सल्ला  दिला. यामध्ये ई-कॉमर्स, डाटा लोकलायझेशन अशा नियमांचा समावेश आहे.

प्रतिकात्मक

By

Published : Apr 27, 2019, 2:07 PM IST

वॉशिंग्टन - सुमारे २०० अमेरिकन कंपन्या चीनमधून भारतात उत्पादन प्रकल्प हलविणार आहेत. याबाबतची माहिती एका संस्थेने दिली. चीनमधील मिळणाऱ्या संधीशिवाय इतरत्र चांगल्या पर्यायी संधी शोधण्यासाठी या कंपन्या भारतात येणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

अमेरिका-भारताच्या रणनीती आणि भागीदारी फोरमचे (युएसआयएसपीएफ) अध्यक्ष मुकेश अघी म्हणाले, अमेरिकन कंपन्या भारतात गुंतवणूक करण्याबाबत चौकशी करत आहे. भारतात नवे येणारे सरकार हे नव्या सुधारणांना चालना देणारे आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता असणारे असेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

सरकारने निर्णय प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणण्याचा त्यांनी सल्ला दिला. यामध्ये ई-कॉमर्स, डाटा लोकलायझेशन अशा नियमांचा समावेश आहे. या कंपन्यांना कसे आकर्षित केले पाहिजे हे आपण समजून घेतले पाहिजे. जमीन सुधारणा, उत्पादन शुल्कमध्ये बदल करण्याची गरज अघी यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details