मुंबई - दिल्लीतील सरकारी शाळांमधील शैक्षणिक दर्जाचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी कौतुक केले आहे. दिल्लीच्या सरकारी शाळांमधून देण्यात येणारे शिक्षण हे खासगी शाळांहून अधिक चांगले आहे, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. ते 'प्रथम' या सेवाभावी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.
सरकारी संस्था या शिक्षणासाठी निधी वाटप करण्यात अधिक उदार राहिल्या आहेत. हे आजवर शिक्षकांच्या पगारीसारख्या बाबीवरून दिसून आले आहे. आता, अधिक चांगली कामगिरी करणाऱ्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे मत अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.