नवी दिल्ली - भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) विमानतळ व्यवस्थापनांकरता कामकाजासाठी नियम प्रक्रिया (एसओपी) जाहीर केली आहे. देशात २५ मे रोजीपासून विमान वाहतूक सुरू होणार आहे. प्रवाशांना थर्मल स्क्रिनिंग क्षेत्रामधून जाणे बंधनकारक आहे.
प्रवास करणाऱ्या १४ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना आरोग्य सेतू अॅप बंधनकारक नसेल. विमानतळ व्यवस्थापनाला टर्मिनल इमारतीमध्ये येण्यापूर्वी प्रवाशांच्या बॅगेचे पूर्ण सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देशातील १०० हून विमानतळांचे नियमन केले जाते. मात्र, दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद शहरामधील विमानतळाचे नियमन खासगी कंपन्यांकडून केले जात आहे.