महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

८० टक्के नोकरी शोधणाऱ्यांना राजकारणात रस, सर्व्हेतून आली माहिती

नव्या पिढीतील तरुणांना सरकारमधील सहभागातून समाजाला मदत होईल असे वाटत असल्याचे इंडिड मॅनेजिंगचे संचालक शशी कुमार यांनी सांगितले. हा २२ ते ३६ वयोगटाच्या तरुणांचा सर्व्हे  २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सेन्ससवाईज वेबसाईटसाठी करण्यात आला.

जॉब

By

Published : Apr 3, 2019, 5:12 PM IST

बंगळुरू - देशात नोकऱ्यांच्या शोधात असणाऱ्यांपैकी ८० टक्के जणांना राजकारणात रस आहे. त्यांना राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय पत्रकार अशा नोकऱ्या करण्यासाठी करिअर करण्याची इच्छा आहे. ही माहिती नोकऱ्या देणाऱ्या एका वेबसाईटच्या सर्व्हेतून समोर आली आहे.


लोकसभा निवडणूक ११ एप्रिल ते मे १९ दरम्यान पार पडत आहे. अशातच नोकरी शोधणाऱ्यांबाबत सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून 21 टक्के तरुणांना राजकारणात तर १२ टक्के तरुणींनी राजकारणात करिअर करण्याची तयारी दर्शविली होती. राजकारणात करिअर करण्यासाठी ५९ टक्के जणांनी सार्वजनिक ठिकाणी भाषण करणे आणि सादरकरणाचे कौशल्य असण्याची गरज व्यक्त केली. तर ५३ टक्के जणांनी नेतृत्व आणि समस्येचे व्यवस्थापन ही कौशल्ये पूर्णवेळ राजकीय नेत्यांसाठी आवश्यक असल्याचे म्हटले.

मुख्य प्रवाहातील राजकारणात २४ टक्के जणांनी रस दाखविला आहे. तर २१ टक्के जणांनी राजकीय पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातून राजकीय करिअर म्हणून स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. ३७ टक्के जणांनी व्यवस्थापन आणि प्रश्न सोडविण्याचे कौशल्याची गरज व्यक्त केली. तर ४७ टक्के जणांनी विश्लेषण क्षमता आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
नव्या पिढीतील तरुणांना सरकारमधील सहभागातून समाजाला मदत होईल असे वाटत असल्याचे इंडिड मॅनेजिंगचे संचालक शशी कुमार यांनी सांगितले. हा २२ ते ३६ वयोगटाच्या तरुणांचा सर्व्हे २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सेन्ससवाईज वेबसाईटसाठी करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details