हैदराबाद– केंद्र सरकारने बंदी लागू केलेल्या 59 चिनी अॅपपैकी काही अॅप देशात चांगलेच लोकप्रिय होते. हे 59 अॅप जानेवारी 2014 पासून 5 अब्ज डाऊनलोड झाले होते.
अॅप विश्लेषक कंपनी सेन्सर टॉवरच्या माहितीनुसार जानेवारी 2014 पासून 59 अॅपचे डाऊनलोडिंगचे प्रमाण 4.9 अब्ज एवढे होते. यामध्ये टिकटॉक व्हिडिओ शेअरिंग अॅपचा एकूण डाऊनलोडमध्ये ३० टक्के हिस्सा राहिला होता. टिकटॉकचे देशात सर्वाधिक 611 दशलक्ष डाऊनलोड झाले होते. टिकटॉकचे फक्त डाऊनलोडचेे जास्त प्रमाण नव्हते तर त्याचे वापरकर्तेही सक्रिय होते.अॅप बंदीला कायद्याचा आधार केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील 69 ए तरतुदीनुसार चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे. या कायद्यानुसार सरकारला संगणकीय माध्यमातील माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे रोखण्यात येण्याचे अधिकार आहेत.