महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

फक्त दहावी पास असला तरी मिळणार महावितरणमध्ये नोकरी, 'या' पदासाठी आहेत ५ हजार जागा - electrical assistant

पदासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. आयटीआयचा तारतंत्री अथवा वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरचे एनसीव्हीटी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

MSEDCL

By

Published : Jul 14, 2019, 6:24 PM IST

मुंबई - महावितरणने विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागांसाठी अर्ज मागविले आहेत. या जागा तीन वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.


पदासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. आयटीआयचा तारतंत्री अथवा वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरचे एनसीव्हीटी प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल २७ वर्षे अशी वयोमर्यादा आहे. विद्युत सहाय्यकाच्या पदासाठी प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै आहे. उमेदवारांना mahadiscom.in या क्रमांकावर अर्ज प्रक्रियेची अधिक माहिती मिळू शकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details