महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

चिनी उत्पादनांच्या विक्रीकरता 49 टक्के भारतीय अनुकूल, पण... - Public opinion on Chinese goods boycott

जर चिनी कंपन्यांनी डाटा चीनबरोबर शेअर केला नाही तर त्यांना केवळ भारतीय उत्पादनांच्या विक्रीची परवानगी द्यावी, असे 25 टक्के लोकांनी सर्वेक्षणात म्हटले आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 9, 2020, 7:51 PM IST

नवी दिल्ली– चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, अशी देशातून मागणी होत असताना प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. चिनी उत्पादनांना विक्री करण्याची परवानगी द्यावी, असे 49 टक्के लोकांना वाटत असल्याचे सर्वेक्षणामधून दिसून आले आहे. मात्र, चिनी कंपन्यांनी डाटा हा भारतामध्येच ठेवावा, अशी सर्वेक्षणातील लोकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

चिनी कंपन्यांवरील उत्पादनांबाबत लोकलसर्कल्सनेण सर्वेक्ष केले. या सर्वेक्षणामधून लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. जर चिनी कंपन्यांनी डाटा चीनबरोबर शेअर केला नाही तर त्यांना केवळ भारतीय उत्पादनांच्या विक्री परवानगी द्यावी, असे 25 टक्के लोकांनी सर्वेक्षणात म्हटले आहे. जर चीनबरोबर कंपन्यांनी डाटा शेअर केला नाही तर त्यांना सर्व उत्पादनांची विक्री करण्याची परवानगी द्यावी, असे सर्वेक्षणातील लोकांनी मत व्यक्त केले आहे.

49 टक्के लोकांना चिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ग्राहकांचा डाटा देशातच ठेवावा, असे वाटते. हा डाटा चीनमधील कंपन्यांच्या मुख्यालयामध्ये ठेवू नये, असे त्यांनी म्हटले आहे. अनेक चिनी कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केली आहे. ज्या भारतीय कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांनी 30 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक केली आहे, अशा कंपन्यांवर कारवाई करावी, असे 30 टक्के लोकांना वाटते. तर 29 टक्के लोकांना कोणत्याही चिनी कंपन्यांविरोधात कारवाई करू नये, असे वाटते.

तर 27 टक्के लोकांना चिनी कंपन्यांविरोधात कारवाई न करता चिनी संचालकांनी राजीनामा द्यावा, असे वाटते. तर केवळ 11 टक्के लोकांनी अशा कंपनीविरोधात कोणती कारवाई करू नये, असे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details