नवी दिल्ली - देशात कांद्याचे भाव १०० रुपयापर्यंत पोहोचल्यानंतर सरकारने आयात सुरू केली आहे. विदेशातून आयात केलेला ८० कंटेनरमधील २ हजार ५०० टन कांदा देशाच्या बंदरावर पोहोचला आहे. उर्वरित ३ हजार टन कांदा लवकरत देशात पोहोचणार असल्याचे कृषी मंत्रालयातील सूत्राने सांगितले.
इजिप्तमधून आयात केलेला ७० कंटनेटर कांदा तर नेदरलँडमधील १० कंटेनर कांदा देशातील बंदरावर पोहोचला आहे. कांदा उत्पादन घेणाऱ्या राज्यांना मुसळधार पावसाचा फटका बसल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेमध्ये आवक कमी झाल्याने कांद्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढून १०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. अशा स्थितीत कांदे आयात झाल्याने भाव आटोक्यात राहतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.