नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाने २५ टक्के मनुष्यबळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तर ३९ टक्के लोकांच्या वैयक्तिक बचतीवर परिणाम झाल्याचे लिंकडिनच्या सर्व्हेक्षणामधून समोर आले आहे.
लिंकडिनने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार ४२ टक्के भारतीय व्यवसायिक (प्रोफेशनल्स) आगामी दोन आठवड्यात नोकरी शोधण्यासाठी वेळ घालविणार आहेत. तर ६४ टक्के व्यवसायिकांनी नवीन शिकण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सर्वेक्षणात सांगितले.