नवी दिल्ली- कोरोना महामारीने प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचेही मृत्यू होत आहेत. कर्तव्यावर असलेले २२९ कर अधिकाऱ्यांचे मृत्यू कोरोनाने झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. या अधिकाऱ्यांबद्दल देश नेहमीच कृतज्ञ राहिल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (सीबीआयसी) विभागाच्या ११० अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) ११९ अधिकाऱ्यांचे महामारीत कर्तव्य बजाविताना मृत्यू झाले आहेत.
हेही वाचा-आरोग्य मंत्रालयाच्या अत्यंत सुस्तावलेपणा आणि चुकीच्या कृतींनी आश्चर्य- आयएमए