नवी दिल्ली - एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) महाराष्ट्राला रस्ते विकासासाठी २० कोटी डॉलरचे कर्ज देणार आहे. यासंदर्भात बँकेत व केंद्र सरकारमध्ये करार झाला. यामधून महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यामध्ये रस्ते सुरक्षितता आणि चांगले दळणवळण करण्यासाठी रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.
फंड बँक आणि एडीबीचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे आणि केंद्रीय अर्थव्यवहार मंत्री आणि सब्यासची मित्रा, एडीबी इंडियाचे भारत उपसंचालक यांच्यामध्ये हा करार झाला आहे. 'महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट'मधून राज्यातील २ हजार १०० किमी मार्गांची अवस्था सुधारेल, असे मित्रा यांनी सांगितले. हे रस्ते सर्व हवामानात चांगले राहतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच ग्रामीण भागातील जनता ही कृषी आणि सामाजिक-आर्थिक केंद्राशी जोडेल, असेही मित्रा म्हणाले.