नवी दिल्ली - डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्राप्तिकर विभागाने टीडीएसच्या नियमात बदल केला आहे. जर १ कोटीहून अधिक रक्क काढल्यास २ टक्के टीडीएस शुल्क लागू करण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला आहे. हा निर्णय १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
१ कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम काढल्यास २ टक्के टीडीएस कपात होणार
वित्तीय वर्ष हे एप्रिल २०१९ पासून सुरू होते . त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने एका किंवा दोन खात्यावरून १ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत काढली तर २ टक्के टीडीएस शुल्क लागू होणार आहे.
ज्या एखाद्या व्यक्तीने १ कोटीहून अधिक रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत खात्यामधून काढली असेल तर २ त्यालाही २ टक्के टीडीसी कपातीचा नियम लागू होणार आहे.
केंद्र सरकारने टीडीस शुल्क लागू करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात घेतला होता. अर्थव्यवस्थेमधील रोख रक्कम कमी करणे आणि रोख रक्कमेचा वापर कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते.
वित्तीय वर्ष हे एप्रिल २०१९ पासून सुरू होते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने एका किंवा दोन खात्यावरून १ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत काढली तर २ टक्के टीडीएस शुल्क लागू होणार आहे.