नवी दिल्ली – देशातंर्गत विमान सेवा तीन महिन्यानंतर 25 मे रोजी सुरू झाली. त्यानंतर 2.81 लाख प्रवाशांनी 25 ते 31 मे दरम्यान देशांतर्गत विमान सेवेने प्रवास केला आहे. ही आकडेवारी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए)दिली आहे.
गेली दोन महिने देशांतर्गत विमान सेवा बंद असल्याने जानेवारी ते मे 2020 दरम्यान प्रवाशांच्या संख्येत 43.4 टक्के घसरण झाली आहे. गतवर्षी मे 2019 दरम्यान देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची 1.2 कोटी संख्या होती. कोरोना महामारीमुळे मर्यादित प्रमाणात मे महिन्यात विमान वाहतूक सुरू होती. त्यामुळे मे महिन्यात प्रवाशांची संख्या घटल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.