मुंबई - बँकेत एखादे महत्त्वाचे काम घेऊन जाणार असाल तर आजच हे काम पूर्ण करा. किंवा लवकरात लवकर तुमचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जानेवारी महिन्यात एकूण 16 दिवस बॅंकेला सुट्ट्या ( Bank Holidays in January 2022 ) असल्याने तुम्ही ही खबरदारी घेतलेली केव्हाही चांगली, अन्यथा कामाचा खोळंबा होऊ शकतो.
बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्यावी -
बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये ( upcoming bank holidays list ) वेगवेगळे असतात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. कोरोना काळात ( Coronavirus Pandemic ) विविध बँकांनी त्यांच्या अनेक सुविधा ऑनलाइन किंवा डोअरस्टेप देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या ( Bank Holiday ) तपासूनच बँकेला भेट द्या. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.
जानेवारीतील बॅंकेच्या सुट्ट्या -
1 जानेवारी 2022 : नव्या वर्षाचा पहिला दिवस (देशभरात सुट्टी)
3 जानेवारी 2022 : नववर्षाचा उत्सव/लोसूंग (सिक्किम)
4 जानेवारी 2022 : लोसूंग (मिझोरम)
11 जानेवारी 2022 : मिशनरी दिवस
12 जानेवारी 2022 : स्वामी विवेकानंद यांची जयंती
14 जानेवारी 2022 : मकर संक्रांत (काही राज्यांमध्ये)
15 जानेवारी 2022 : पोंगल (आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडू)