मुंबई -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०१९-२० या आर्थिक वर्षचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प झाल्यानंतर काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच पेट्रोल आणि डिझेल महगणार असल्याचे समोर आले आहे.
पेट्रोल-डिझेल लीटरमागे 1 रुपया अतिरिक्त कर आकारण्यात येणार असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलिटर दोन रूपये वाढ होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. या भाववाढीचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी वाचा -
१) जागतिक तेलाचे दर हे यंदाच्या वर्षात १०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढीव दर कायम राखणे अशक्य आहे. मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत गेले होते. या कारणांमुळे आगामी काळात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता नाही
२) इंधनाचे दर वाढले तर व्यापारी मालांच्या किंमतीतही वाढ होणार आहे. उत्पादन खर्च वाढण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे त्याचा फटका मालांच्या किंमतीवर होणार आहे.
३)इंधनाचे दर असेच वाढत गेले तर महागाईचा आलेख आणखी उंचावू शकतो. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अनुसार पक्का माल आणि व्यापारी माल विशेषत: तेलमाल, किराणा सामान यांच्या किंमतीत ४ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
4) जर या अहवालांवर विश्वास ठेवायचा झाला तर, आरबीआयची सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करीत आहे. देश आणि तेलाच्या किंमती वाढत राहिल्यास 25 अब्ज डॉलर्सची उधार देण्याची प्रमुख किंमत विचारात घेता येईल. आणि ह्यामुळे महागाई लांबण्याची भिती तज्ञ व्यत्क करत आहेत. हे दर स्थिर ठेवावेत की ठोस पावले उचलावीत याविषयी संसदीय समिती ४ ते ६ जूनला बैठक होणार आहे. दर त्यांनी या दराचा नंतर विचार करायचे ठरवले तर, तुम्हाला कर्जावर जास्त व्याजदर आकारला जाईल.
5) या वाढीव महागाईमुळे बचतीवर परिणाम होईल. वस्तू आणि व्यापारी माल जास्त पैसे देऊन विकत घ्यावा लागेल. तेलाचे दर वाढले तर सेवा करात वाढ होऊन बचतीवर परिणाम होईल. याचा थेट परिणाम प्रवासी किंवा खाजगी वाहनांच्या मालकांवर होऊ शकतो.
6) इंधनवाढीचा थेट परिणाम रुपयावर होऊ शकतो. आयात खर्चात वाढ होऊन तूट वाढू शकते. आणि तूट वाढली तर परकीय विनिमय दरावर त्याचा परिणाम दिसू शकतो.
7) वाढीव महागाईचा परिणाम म्हणून रिझर्व्ह बँक जास्त व्याजदर आकारू शकते. त्यामुळे कर्ज घेणाऱयांना त्याचा फटका बसू शकतो.