शिर्डी- शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आज (१८ एप्रिल) कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याने शिर्डी मतदारसंघांमध्ये तमाम कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंची आज कोपरगावात जाहीर सभा
कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे व सहा पैकी दोन भाजप आमदार, तीन काँग्रेस आमदार व एक राष्ट्रवादी आमदार असे बलाबल आहे. आता पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना या मतदारसंघात महायुतीची उमेदवारी मिळाली आहे. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी संपूर्ण मतदारसंघात महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या कार्यकर्त्यांना अधिक प्रेरणा मिळण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिर्डी दौ-यावर येत असून कोपरगाव येथे त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे.