लाहोर - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ३० मे पासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी संघातील खेळाडूंना आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन जाण्यास मान्यता दिली नाही. मात्र, पीसीबीने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या द्वीपक्षीय मालिकेदरम्यान खेळाडूंना आपल्या पत्नी आणि मुलांना सोबत ठेवता येणार असल्याचे सांगितले.
विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी खेळाडूंना पत्नी, मुलांना सोबत नेता येणार नाही - पीसीबी
यापूर्वी २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी पाकिस्तान संघातील खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत होते.
पीसीबीने स्पष्ट केले आहे की, विश्वचषक स्पर्धेच्या वेळी खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंब नसणार आहे. यापूर्वी २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी पाकिस्तान संघातील खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत होते.
पाकिस्तानचा संघ २३ एप्रिल रोजी इंग्लंडकडे रवाना होणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानचा पहिचा सामना इंग्लंडविरुद्ध ३१ मे रोजी ट्रेंट ब्रीजमध्ये होणार आहे. पीसीबीने गुरुवारी विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यात मोहम्मद आमिरला स्थान न दिल्याने निवड समितीवर टीकेची झोड उठली आहे.
TAGGED:
पीसीबी