महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

बांगलादेशने लॉन्च केलेल्या जर्सीवर यामुळे भडकले चाहते, बोर्डाला घ्यावा लागला जर्सी बदलण्याचा निर्णय - undefined

विश्वचषकात बांगलादेशचा पहिला सामना २ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

बांगलादेश क्रिकेटचा संघ

By

Published : Apr 30, 2019, 10:39 PM IST

ढाका - इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी सोमवारी बांगलादेश क्रिकेट संघाने नवी जर्सी लॉन्च केली. पण ही जर्सी लॉन्च केल्यावर बांगलादेशी फॅन्स क्रिकेट बोर्डावर भडकले. लॉन्च करण्यात आलेली नवी जर्सी पाकिस्तान संघासारखी आहे. फॅन्सच्या नाराजीनंतर बोर्डाने पुन्हा नवी जर्सी लॉन्च करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे.


विशेष म्हणजे यावर्षी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची जर्सीदेखील हिरव्या रंगाची आहे. यामुळे फॅन्सच्या मते, बांगलादेशची जर्सी थोडी वेगळी पाहिजे होती. लॉन्च केलेल्या नव्या जर्सीत लाल आणि हिरवा झेंडादेखील नव्हता.


बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे सीईओ निजामुद्दीन चौधरी प्रसारमाध्यामांशी बोलताना म्हणाले, ही जर्सी चेंज करण्यात येईल. मात्र विंडीज आणि आयर्लंड यांच्याविरुद्ध होणाऱ्या मालिकेत हीच जर्सी असेल. विश्वचषकात मात्र नवी जर्सी लॉन्च करण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले, नव्या जर्सीत लाल आणि हिरव्या रंगाचा वापर केला जाईल.


नव्या जर्सीचा फोटोही बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या नव्या जर्सीत लाल पट्टीवर बांगलादेश, असे लिहिले आहे. विश्वचषकात बांगलादेशचा पहिला सामना २ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details