महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

सोलापुरात कोरोनाची परिस्थिती भयावह; वृद्ध महिलेचा उपचाराअभावी रिक्षात मृत्यू - mangalvedha news solapur

मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावामधील कमल ज्ञानू बोरकर या वृद्ध महिलेला हृदयविकाराचा त्रास होत होता. मात्र, त्यांना मंगळवेढा शहरातील खासगी व कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळाले नाही. त्यानंतर पंढरपूर शहरामधील लाईफ लाईन, जनकल्याण, गॅलेक्सी व उपजिल्हा रुग्णालय येथेही बेड उपलब्ध झाला नाही. त्यात कमल बोरकर यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे ऑटो रिक्षामध्येच अंत झाला.

women died in rikshaw
महिलेचा रिक्षात मृत्यू

By

Published : May 5, 2021, 1:54 PM IST

Updated : May 5, 2021, 3:41 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका बसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत पंढरपूर, मंगळवेढ्यातील परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून बिकट आहे. तसेच बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींच्या उपलब्धतेबाबतही समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर शहरात ऑक्सिजन अभावी वृद्ध महिलेचा रिक्षेत मृत्यू झाला.

सोलापुरात कोरोनाची परिस्थिती भयावह; वृद्ध महिलेचा उपचाराअभावी रिक्षात मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावामधील कमल ज्ञानू बोरकर या वृद्ध महिलेला हृदयविकाराचा त्रास होत होता. मात्र, त्यांना मंगळवेढा शहरातील खासगी व कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळाले नाही. त्यानंतर पंढरपूर शहरामधील लाईफ लाईन, जनकल्याण, गॅलेक्सी व उपजिल्हा रुग्णालय येथेही बेड उपलब्ध झाला नाही. त्यात कमल बोरकर यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे ऑटो रिक्षामध्येच अंत झाला. पैशाची उपलब्धता असतानाही उपचाराभावी कमल बोरकर यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला तालुक्यात बेड उपलब्ध नसल्यामुळे कमल बोरकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे भाऊ माया आप्पा मासाळ यांनी केला आहे.

जिल्ह्याला स्थानिक पालकत्व असणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज -

गेल्या एका आठवड्यापासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या ग्रामीण भागात 15 हजार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दोन आठवड्यापासून पण कोविड रुग्णांना बेड मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड, लसीकरण यांचा जिल्ह्यात मोठा तुटवडा आहे. याबाबत गेल्या आठवड्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री भरणे यांची भेट घेऊन कोविडबाबत समस्या ही मांडल्या होत्या. मात्र, भरणे यांनी जिल्ह्यातील कोरोना संदर्भात कोणतेच ठोस निर्णय घेतले नाहीत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्त निवास कोविड सेंटर मान्यता अभावी पडून आहे, पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात मोठ्या कोविड सेंटरची गरज भासत आहे. प्रशासनाने रेमडेसिवीर औषधासाठी हेल्पलाईन बनवली. पण तरीही रुग्णांच्या नातेवाईकांना हे औषध मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या औषधाच्या टंचाईची समस्या अजूनही सोडवली गेली नाही. जिल्ह्याचे पालकत्व सांभाळण्यासाठी सक्षम आशा स्थानिक लोकप्रतिनिधीची गरज निर्माण झाली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात उपचाराअभावी मृत्यूची संख्या दुप्पट -

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नंतर मतदारसंघातील कोरोना परिस्थिती प्रचंड बिकट झाली आहे. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात रुग्णांना उपचारासाठी बॅड उपलब्ध होताना दिसत नाही. तर दोन्ही तालुक्यातील कोविड सेंटरही प्रमाणापेक्षा अधिक रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील रोज सुमारे 400 कोरोना बाधित रुग्ण हे नव्याने आढळत आहेत. दोन तालुक्यांमध्ये मिळून सुमारे पाच हजार कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींच्या उपलब्धता नसल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. दोन्ही तालुक्यातील मृत्यू दरही मोठा आहे. त्यातच जिल्हा प्रशासनाकडून कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटल संदर्भात प्रस्ताव येऊनही त्याला मंजुरीसाठी वेळ जात आहेत. कोविड परिस्थितीबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधी उदासीन दिसून येत आहे.

मतदारसंघातील राजकीय नेते राजकारण करण्यात मश्गुल -

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल दोन मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे समाधान आवताडे हे थोड्या मताने विजय झाले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी निकालाबाबत शंका उपस्थित केल्या. त्यातूनच राजकारण चालू केले आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये कोरोना महामारीची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच नवीन लोकप्रतिनिधी व विरोधक निकालावरून राजकीय हेवेदावे करण्यात मश्गुल झाल्याचे दिसून येत आहेत. निवडणूक बाजूलासारून सर्वसामान्य नागरिक प्रश्नाबाबत राजकीय नेते गंभीर असल्याचे दिसून येत नाही.

Last Updated : May 5, 2021, 3:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details