अभिनेत्री आदिती राव हैदरी स्वतःचे फोटो गुगलवर सर्च करीत नाही. तिला याबद्दलचा वाईट अनुभव आलाय. तिने जेव्हा स्वतःचे हिडीस फोटो इंटरनेटवर पाहिले तेव्हा तिने स्वतःला गुगल सर्च करणे बंद केले असल्याचे सांगितले.
आदितीने हा खुलासा 'फिट अप विथ द स्टार सिझन २' या वूट्स वरील एपिसोडमध्ये बोलताना केला.
'ये साली जिंदगी' या चित्रपटाच्या शूटींगचा अनुभव सांगताना आदिती म्हणाली की, 'तिने मागे जाऊन पाहिले तर तिचा बॅकलेस फोटो तिला इंटरनेटवर आढळून आला.'
''मी एकदा गुगलवर स्वतःला सर्च केले आणि माझ्या सुरुवातीच्या चित्रपटाच्या अगोदरपासूनच्या ज्या इमेजीस आल्या त्या किळसवाण्या होत्या. त्यामुळे मी स्वतःला गुगल करायचे नाही हे ठरवून टाकले,'' असे ती म्हणाली.
आदितीने 'ये साली जिंदगी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'भूमी', 'रॉकस्टार', 'मर्डर ३', 'देल्ली ६' आणि 'दास देव' या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहेत.
आपण जर पार्टी दिली तर त्यात कोण पाहुणे असतील याचा उलगडाही आदितीने यावेळी केला. 'मी शाहरुख खान आणि करण जोहरला निमंत्रण देईन,' असे ती म्हणाली.