जिनिव्हा- जागतिक आरोग्य संघटना सोडण्याच्या निर्णयाचा अमेरिका पुन्हा विचार करेल, अशी आशा संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केली. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जगातील महासत्तांमध्ये ‘सहकार्य आणि एकतेची’ गरज असल्याचे घेब्रियासस म्हणाले. जगभरात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर डब्ल्यूएचओ चीनच्या प्रभावापुढे झुकली. महामारीच्या पहिल्या टप्प्यात जगाला धोक्याची जाणीव करुन देण्यात संघटना अपयशी ठरल्याचे म्हणत अमेरिकेने जुलै महिन्यात डब्ल्युएचओतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
कोरोनासारख्या महाभयंकर शत्रूचा आपण विभागलेल्या जगात सामना करू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेसारख्या बहुपक्षीय संस्था सहकार्य करू शकतात. मोठे देश संपूर्ण जग एकत्र आणू शकतात, असे घेब्रियासस म्हणाले.