मुंबई- सांघिक कामगिरीच्या जोरावर हैदराबादचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहे. हैदराबादकडे काही मॅचविनर खेळाडू आहेत. त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे हैदराबाद सध्या गुणतालिकेत टॉपवर आहे. हैदराबादकडे असा एक गोलंदाज आहे तो जेव्हा सामने खेळतो तेव्हा हैदराबाद हमखास सामने जिंकतो.
या क्रिकेटरचे नाव मोहम्मद नबी आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायजर्स हैदराबादकडून खेळत आहे. तो जेव्हा खेळण्यासाठी उतरतो तेव्हा संघ जिंकतोच. सनरायजर्स हैदराबादच्या यशस्वी कामगिरीमध्ये सर्वात मोठे योगदान डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रो यांचे जितके आहे तितकेच मोहम्मद नबी याचेही आहे.