महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

'देशासमोरील अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा दृढनिश्चयी होऊन सामना करु' - व्यंकय्या नायडू भाषण

आत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारताला नवी चालना मिळेल. पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंज्ञत्रान आणि प्रशिक्षित मानव संसाधनाच्या जोरावर भारत आर्थिक विकासात मोठी उडी घेईल, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By

Published : Jul 5, 2020, 5:31 PM IST

नवी दिल्ली - कोरोना आणि भारत चीन सीमावादामुळे देशापुढे निर्माण झालेल्या आव्हानांचा दृढनिश्चयी होऊन सामना केला पाहिजे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले. देशांतर्गत आणि बाह्य कोणत्याही स्वरूपाचे आव्हान असो आपण निश्चयी असायला पाहिजे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. भारतीय बनावटीचे 'एलिमेन्टस' या सोशल मीडिया अ‌ॅपच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

उपराष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे कौतुक केले. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होईल. भारत इतिहासाच्या महत्त्वपूर्ण काळातून जात आहे. आपण अनेक देशांतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करत आहोत. मात्र, आपण या संकटकाळात निश्चयी राहिले पाहिजे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले.

आत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारताला नवी चालना मिळेल. पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मानव संसाधनाच्या जोरावर भारत आर्थिक विकासात मोठी उडी घेईल. प्रत्येक भारतीयाने हे अभियान स्वत:चे अभियान असल्याचे समजून कामाला लागा. संसाधनांचा शहाणपणाने आणि योग्य रितीने वापर केल्यास भारत नक्कीच आपली स्वप्ने पूर्ण करेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details