महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

क्वारंटाईन सेंटरमधील कोरोनाबाधित महिलेसोबत अश्लील वर्तन करणारा चौकीदार गजाआड - Watchmen harrassed women pune

16 जुलैला उशिरा रात्री एक वाजता लोकेशने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर फोन केला आणि काही मदत लागल्यास सांगा असा मेसेज टाकला. त्यानंतर पहाटे दोन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत तो दरवाजा वाजवून फिर्यादी महिलेला सतत त्रास देत होता. मधे फोनवर त्याने तिच्याशी अश्लील संभाषणही केले. या सर्व प्रकारामुळे महिला घाबरून गेली होती.

Corona patient harrassment pune
Corona patient harrassment pune

By

Published : Jul 23, 2020, 4:18 PM IST

पुणे- कोरोनाची लागण झालेल्या महिलेसोबत क्वारंटाईन सेंटरमध्ये अश्लील वर्तन करणाऱ्या चौकीदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले. लोकेश दिलीप मते (वय 30) असे गजाआड झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका क्वारंटाईन केंद्रात 16 जुलैला हा प्रकार घडला होता. एका 27 वर्षीय महिलेने या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांना तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महाविद्यालयात क्वारंटाईन केंद्र आहे. या केंद्रात एक 27 वर्षीय महिला उपचार घेत होती. केंद्रात तक्रारकर्ती महिला ही एकटीच होती. त्या ठिकाणी लोकेश हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. दरम्यान 16 जुलैला लोकेश हा महिलेच्या रूममध्ये गेला आणि सुरक्षेच्या कारणास्तव आलो असे सांगून तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर, रात्री एक वाजता लोकेशने महिलेच्या मोबाईलवर फोन केला आणि काही मदत लागल्यास सांगा असा मेसेज टाकला. त्यानंतर पहाटे दोन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत तो दरवाजा वाजवून फिर्यादी महिलेला सतत त्रास देत होता. मधे फोनवर त्याने तिच्याशी अश्लील संभाषणही केले. या सर्व प्रकारामुळे महिला घाबरून गेली होती.

दुसऱ्या दिवशी महिलेने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र व्यवहार करत कारवाई करण्याची मागणी केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या सर्व प्रकाराची चौकशी करत महिलेची फोनवरून तक्रार घेतली आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details