महाराष्ट्र

maharashtra

शाळा सुरू करण्यासंदर्भात गावात बैठक घेण्याचे वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

By

Published : Jun 25, 2020, 10:45 PM IST

शाळा व्यवस्थापन समितीने कोरोना संदर्भात घ्यायची काळजी, सोशल डिस्टनसिंग, बैठक व्यवस्था, अतिरिक्त खोल्या, गरज पडल्यास 2 पाळीत शाळा घेता येईल का, यासर्व बाबींचे अवलोकन करायचे आहे. खाजगी, अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांनी स्वच्छता, शाळांचे निर्जंतुकीकरण करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Collector bhimanwar
Collector bhimanwar

वर्धा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा या विलंबाने सुरू होणार आहे. पण ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे आणि पालकांच्या भावना जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी 26 जूनला बैठक घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या बैठकीत स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी गावपातळीवर शाळा सुरू करण्याचा संदर्भात काळवायचे आहे. पण ही बैठक सुद्धा कोरोनाच्या नियमावली पाळून किंवा ऑनलाईन पर्याय निवडून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या 15 जूनच्या शासन निर्णयान्वये टप्प्या टप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे. पहिल्या टप्यात इयत्ता 9 वी, 10 वी, 12 वी चे वर्ग 20 जुलै पासून सुरू करण्याचे नियोजन करायचे आहे. यासाठी गावातील सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची पटसंख्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून त्याप्रमाणात उपलब्ध वर्गखोल्या, शाळेतील शिक्षाकांची उपलब्धता, या सर्व बाबींचा विचार करून गावातील शाळेसंदर्भात निर्णय घेण्यात यावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

शाळा व्यवस्थापन समितीने कोरोना संदर्भात घ्यायची काळजी, सोशल डिस्टन्सिंगच, बैठक व्यवस्था, अतिरिक्त खोल्या, गरज पडल्यास 2 पाळीत शाळा घेता येईल का, यासर्व बाबींचे अवलोकन करायचे आहे. खाजगी, अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांनी स्वच्छता, शाळांचे निर्जंतुकीकरण करावे. सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून, तिसरी ते पाचवी सप्टेंबर पासून, पहिली व दुसरीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घ्यावा. इयत्ता दहावीच्या निकालावर आधारित अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

शाळा विलगीकरण किंवा अन्य कोरोना संदर्भात उपाययोजना म्हणून उपयोगात आणली असल्यास शाळा आणि परिसर निर्जंतुकीकरण करून घ्यावी. यासह त्या गावात एक महिन्याच्या कालावधीत एकही रुग्ण आढळला नसवा हे तपासून शाळा सुरू करण्यास शिक्षणाधिकारी यांनी परवानगी द्यायची आहे. याशिवाय भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास शिक्षणाचा खोळंबा होऊ नये म्हणून ऑनलाईन, डिजिटल किंवा ऑफलाईन पद्धतीचे नियोजन करावे. यासाठी सर्व पालकांना पूर्वकल्पना देऊन प्रोत्साहित करावे. भविष्यात विविध माध्यमांव्दारे ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होणार आहे. याची पालकांना कल्पना देऊन त्याबाबत मुलांना वापर करण्यास सांगण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

यासाठी डायटचे प्राचार्य यांनी विद्यार्थी किंवा शिक्षक यांच्या अनुपस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये याकरीता शैक्षणिक साहित्याची (E-Content) निर्मिती करावी. त्यामध्ये प्रथम सत्रातील सर्व घटकांचा समावेश असावा. त्याकरीता जिल्ह्यातील विषय निहाय, इयत्ता निहाय उत्कृष्ट शिक्षकांच्या अध्यापनाचे व्हिडिओ चित्रण तयार करून शाळांपर्यंत पोहोचविण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details