बंगळुरू- आयपीलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकात्याने बंगळुरूवर रोमहर्षक विजय मिळविला. २०० पेक्षा जास्त धावा काढूनही बंगळुरूच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. आंद्रे रसेल याने स्फोटक खेळी करत बंगळुरूच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला. विराटच्या संघाचा हा सलग पाचवा पराभव होता. या पराभवानंतर विराटने आपले तोंड टोपीत लपविले. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पराभवानंतर विराटने लपविले टोपीत तोंड, चाहते म्हणाले यापेक्षा दु:खद काहीच नाही - virat kohli
विराट पुढे बोलताना म्हणाला की, आमच्यासाठी हा सीजन खूपच निराशाजनक राहिला आहे. मला आशा आहे की, पुढच्या सामन्यात आम्ही पुनरागमन करु. स्वत:वर विश्वास ठेवायला लागेल.

पराभवानंतर विराटने लपविले टोपीत तोंड
विराटच्या या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, यापेक्षा दु:खद काहीच असू शकत नाही. सामना संपल्यानंतर विराटने प्रतिक्रिया देतना म्हणाला की, आम्ही शेवटच्या चार षटकात सामना गमावला. गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. मी अत्यंत चुकीच्या वेळी बाद झालो. अजून २०-२५ धावा काढता आल्या असत्या.
विराट पुढे बोलताना म्हणाला की, आमच्यासाठी हा सीजन खूपच निराशाजनक राहिला आहे. मला आशा आहे की, पुढच्या सामन्यात आम्ही पुनरागमन करु. स्वत:वर विश्वास ठेवायला लागेल.