मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माने मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर बंगळुरू संघातील खेळाडूंना त्यांच्या घरी पार्टी दिली. दरम्यान, आयपीएलचा ३१ वा सामना १५ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर झाला. हा सामना मुंबईने ५ गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर रॉयल चॅलेजर्सच्या संघातील खेळाडूंना त्यांनी पार्टी दिली.
बंगळुरूचा खेळाडू युझवेंद्र चहलने डिनरनंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहे. त्याचसोबत डिनर दिल्याबद्दल कोहली दांपत्याचे त्याने आभार मानले. याचसोबत देवदत्त पडिक्कलनेही विराट आणि अनुष्कासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.