मोहाली - पंजाबचा अष्टपैलू सॅम करन आयपीएलच्या १२ व्या मौसमात हॅटट्रीक घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने दिल्लीविरुद्ध झालेल्या सोमवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने २० धावा केल्या. तर २.२ षटकांची गोलंदाजी करत ११ धावा देत हॅट्रीकसह ४ गडी बाद केले. सॅमने आधी हॅटट्रीक आणि नंतर प्रीती झिंटासोबत मैदानात भांगडा केला.
पंजाबने दिल्ली समोर १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. सॅमने हॅट्ट्रीक घेतल्याने दिल्लीचा संघ १५२ धावांतच तंबूत परतला. विजयानंतर प्रीती झिंटा एवढी आनंदी होती की, ती सॅमची गळाभेट घेत तिने आनंद साजरा केला. त्याच्यासोबत भांगडाही केला.