महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

हवेत आकार बदलू शकणारे ड्रोन अमेरिका लवकरच वापरणार - आकार बदलणारे ड्रोन

हवेमध्ये आकार बदलता आल्यामुळे ड्रोनची कार्यक्षमता वाढणार आहे. उड्डाण घेतल्यानंतर ड्रोनला जे काम करायचे आहे, त्यानुसार त्याचे विंग्ज (पंख) कमी जास्त करता आल्यामुळे गरजेनुसार त्याचा वापर करण्यात येणार आहे.

ड्रोन
ड्रोन

By

Published : Jun 20, 2020, 8:03 PM IST

वॉशिंग्टन डी. सी -अमेरिकीचे लष्कर लवकरच अत्याधुनिक असे ड्रोन विविध मिशनसाठी तैनात करणार आहे. याला ड्रोन किंवा 'एरिअल व्हेईकल' असेही म्हणतात. या ड्रोन्सची खास बाब म्हणजे ते हवेमध्ये उड्डाण घेतल्यानंतर आपला आकार बदलू शकणार आहेत.

हवेमध्ये आकार बदलता आल्यामुळे ड्रोनची कार्यक्षमता वाढणार आहे. उड्डाण घेतल्यानंतर ड्रोनला जे काम करायचे आहे, त्यानुसार त्याचे विंग्ज (पंख) कमी जास्त करता आल्यामुळे गरजेनुसार त्याचा वापर करण्यात येणार आहे.

समजा एखाद्या ऑपरेशनमध्ये ड्रोनला लवकर स्टेशनवर माघारी यायचे आहे. किंवा एखाद्या स्थळी खुप वेळ हवेत घिरट्या घालत थांबायचे आहे, त्यानुसार ते आपला आकार बदलू शकेल, त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढेल, असे लष्कराच्या आर्मी रिसर्च लॅबोरेटरीतील कॉम्बॅट कॅपॅबलिटीज डेव्हलपमेंट कमांड येथील एरोस्पेस इंजिनियर फ्रान्सिस फिलिप यांनी सांगितले.

जेव्हा ड्रोनला जलदपणे एखाद्यास्थळी जायचे असते तेव्हा छोटे पंख उपयुक्त ठरतात. मात्र, जास्त वेळ आकाशात थांबायचे असेल तेव्हा मोठे पंख गरजेचे असतात, त्यामुळे त्याची कामाची क्षमता वाढते असे फिलिप यांनी सांगितले. भविष्यात युद्धासाठी जी उपकरणे बनवण्यात येतील, त्यावर या संशोधना थेट परिणाम होणार आहे. मागील 20 वर्षांपासून ड्रोनच्या आकारात बदल करण्यासाठी संशोधन सुरू आहे, असे फिलिप यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details