महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 10, 2020, 7:12 PM IST

ETV Bharat / briefs

अमेरिकन एअर फोर्सच्या प्रमुखपदी प्रथमच कृष्ण वर्णीय अधिकाऱ्याची निवड

चार्ल्स ब्राउन ज्युनियर लढाऊ विमानाचे पायलट असून आतापर्यंत 2900 तासाहून अधिक फ्लाइंग तास त्यांच्या नावावर आहेत. ज्यात 130 लढाया आहे.

national news
national news

वॉशिंगटन -अमेरीकन सिनेटने मंगळवारी एकमताने जनरल चार्ल्स ब्राउन ज्युनियर यांना अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख घोषित केले. देशाच्या लष्करी सेवेतील नेतृत्व करणारे ते पहिलेच कृष्णवर्णीय अधिकारी बनले आहेत. उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी निवड प्रक्रियेत अध्यक्ष पद भूषवत महत्त्पूर्ण पाऊले उचलली. यात 98-0 एवढ्या बहुमताने ब्राऊन यांची निवड करण्यात आली. याला पेन्स यांनी ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे.

मिनीयापोलिसमधील पोलीस कोठडीत झालेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर अमेरिकन प्रशासन आणि रिपब्लिकन कॉन्फरन्सनच्या श्वेत सिनेट सदस्यांनी हे मतदान केले. देशात होत असलेली आंदोलने आणि सोबतच कोरोना विषाणू यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. ब्राउन यांनी नुकतेच यूएस पॅसिफिक एअर फोर्सचे कमांडर म्हणून काम पाहत होते. ते लढाऊ विमानाचे पायलट असून आतापर्यंत 2900 तासाहून अधिक फ्लाइंग तास त्यांच्या नावावर आहेत. ज्यात 130 लढाया आहे. त्यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी वांशिक भेदभावात आयुष्यभर श्वेत समाजात जगण्याच्या धडपडीचे वर्णन केले आहे.

"जेव्हा मी मझ्या एअरफोर्स कारकिर्दीबद्दल विचार करत होतो तेव्हा, मी माझ्या दलामधील बहुतेकदा आफ्रिकन अमेरिकन किंवा एक वरिष्ठ अधिकारी म्हणून आफ्रिकन अमेरिकन असल्याचे ते म्हणाले. ब्राऊन कच्च्या स्वरात म्हणाला की, "मी माझ्या बरोबरीच्या माझ्या सारख्याच छातीवर समान पंख असलेले फ्लाइट सूट घालतो तेव्हा दुसर्‍या सैन्य सदस्याने विचारणा केली की, 'तुम्ही पायलट आहात काय?'

ब्राऊन हे टेक्सास टेक युनिव्हर्सिटीत रिझर्व्ह ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्स (आरओटीसी) प्रोग्रामचे विशिष्ट पदवीधर म्हणून 1984चे पदवीधर आहेत. त्याने स्क्वॉड्रॉन आणि विंग पातळीवर विविध पदांवर काम केले असून फायटर स्क्वाड्रन आणि दोन फाइटर विंग्सची कमांडंट म्हणून कामगुरी केली आहे. ते यूएस एअर फोर्स वेपन्स स्कूलमध्ये एफ -16 प्रशिक्षक देखील होते. सैन्.दलात 21 टक्के पेक्षा जास्त आफ्रिकन अमेरिकन लोक सैन्यात आहेत, तर 10 टक्के मरीन कॉर्प सर्वात कमी आहे. अश्वेत नेव्हीचा सुमारे 17 टक्के आणि हवाई दलाच्या 15 टक्के पेक्षा कमी भाग आहेत. परंतू रँकवर आधारित अॅक्टिव्ह ड्यूटी सैन्यात बरेच मोठे वांशिक विभाजन आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details