महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

सांगली : जतमध्ये अवकाळीचा फटका; आसंगी तुर्कमध्ये विज पडून छप्पर जळून खाक - Jat sangli unseasonal rain

जत तालुक्यात अवकाळीचा मोठा फटका बसला. भिमु दळवाई यांच्या घरावर वीज कोसळल्याने बोकडाची विक्री करुन ठेवलेले २० हजार रुपये व ज्वारी, गहू, घरातील कपडे, इतर संसारउपयोगी साहित्य सर्व जळून खाक झाले आहे.

Jat sangli
जत अवकाळी पाऊस

By

Published : May 9, 2021, 1:55 PM IST

सांगली -जत तालुक्यात शुक्रवारी अवकाळी पाऊस झाला. यादरम्यान आसंगी तुर्क येथील भीमु दऱ्याप्पा दळवाई यांच्या राहत्या छप्परवजा घरावरती शुक्रवारी दुपार साडेचार वाजताच्या सुमारास वीज कोसळली. यामुळे छप्पर, रोख रक्कमेसह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

जत तालुक्यात अवकाळीचा मोठा फटका बसला. भिमु दळवाई यांच्या घरावर वीज कोसळल्याने बोकडाची विक्री करुन ठेवलेले २० हजार रुपये व ज्वारी, गहू, घरातील कपडे, इतर संसारउपयोगी साहित्य सर्व जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरात कोण नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच तलाठी डी. वाय. कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details